DNA Live24 2015

नगर जिल्ह्यात ५४ हजार शेतकरी लाभार्थी

अहमदनगर :
जिल्‍हयात एक लाख 53 हजार 972 लाभार्थ्‍याना बोंड अळीसाठीचे  83 कोटी 51 लाख 29 हजार इतके अनुदान त्‍यांच्‍या बँक खात्‍यावर वर्ग करण्‍यात आले आहेत.

संभाव्‍य टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन रोजगार हमी योजने अंतर्गत 34 हजार 982 कामांचे सेल्‍फ तयार करण्‍यात आले असून त्‍याची एकूण मजूर क्षमता 43 लाख 89 हजार इतकी आहे. सध्‍या जिल्‍हयात रोहयोची 1 हजार 902 कामे सुरु असून त्‍यावर 6 हजार 933 मजूर काम करत असल्‍याची जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

राज्‍य शासनाने 14 व्‍या वित्‍त आयोगातून वीज कंपनीला पाणी पुरवठा योजनांच्‍या थकीत वीज बिलाचा निधी थेट वर्ग केला आहे. त्‍यामुळे महावितरणने कोणत्‍याही पाणीपुरवठा योजनांची वीज तोडू नये असे स्‍पष्‍ट निर्देश देण्यात आले आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget