DNA Live24 2015

बोलके मुख्यमंत्री दुष्काळावर गप्प का : मुंडे


मुंबई :
राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना बोलके मुख्यमंत्री दुष्काळाच्या मुद्द्यावर गप्प का, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


मुख्यमंत्री सातत्याने मुंबईशी संबंधित प्रश्न, इमारत व्यावसायिकांच्या समस्या आणि विविध ठिकाणांच्या मेट्रोंच्या प्रश्नावर बोलत आहेत. मात्र, आमचा बळीराजा दुष्काळाने होरपळून निघत आहे त्याबद्दल मुख्यमंत्री चकार शब्दही का बोलत नाहीत? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे का, असा सवाल करत केवळ सरकारी कागद न रंगवता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा या राज्यातील शेतकरी जगणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातही कमीअधिक फरकाने दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी हवालदिल आहेत. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असून पिण्याच्या पाण्याची टंचाईही आतापासूनच जाणवू लागली आहे. याबाबत चिंता व्यक्त करत मुंडेंनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget