DNA Live24 2015

आता खायला मिळणार सोनेरी केळं..!

कृषी संशोधन क्षेत्रात अमेरिकेचा टक्का वाढतो आहे. अमेरिकेच्या क्वीन्सलँड विद्यापीठाने ,  (Queensland university of management ) केळाची नवीन जात विकसित केली आहे. सदर वाणाचे  "सोनेरी केळ " असे नामकरण करण्यात आले आहे. केळाचे वैशिष्ट्य  म्हणजे केळाच्या गराचा रंग सुद्धा सोनेरी आहे. भविष्यात भारतीय केळांच्या बनात आत्ता सोनेरी केळी दिसु शकतील.

लेखक : विशाल केदारी (कृषी पत्रकार)

प्राध्यापक डेल यांची एका तपाची मेहनत 

विद्यापीठात बारा वर्षांपासून केळीवर संशोधन सुरु होते. एकूण २१ लोकांचा समूह संशोधनावर काम करत होता. युगांडा देशाचीअ जिवनस्तवाची गरज पुर्ण करण्यासाठी  केळीवर संशोधन सुरु होते. 

बिल ॲंड मेलिंडा गेटस फौंडेशनची मदत.. 

सोनेरी केळी नावाचे वाण विकसीत करण्यासाठी १० मिलियन डॉलर खर्च आला होता. बिल ॲंड मेलिंडा गेटस फौंडेशनच्या वतीने सदर संशोधन यशस्वी करण्यास मदत करण्यात आली होती.

केळींमध्ये केलेले बदल..

केळींवर जनुकीय फेरबदल प्रक्रिया करण्यात आली होती. जनुकीय फेरबदलांमुळे केळीच्या मुळ जींन्स मध्ये बदल करण्यात आले आहेत. जींन्स बदलामुळे केळीतील अ जिवनसत्वाची मात्रा वाढली असल्याचे डेल यांनी स्पष्ट केले आहे.

युगांडाला फायदा 

सोनेरी केळींचा सर्वाधिक फायदा युगांडा देशाला होणार आहे. युगांडा देशातील लहान मुले 'जिवनसत्वाच्या अभावी दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लहान मुलांमध्ये अ जिवनसत्वाचे प्रमाण कमी असेल तर अंधत्व येण्याचे प्रमाण खुप आहे. जगभरात दरवर्षी सरासरी ६ ते ७ लाख बालके 'जिवनसत्वाच्या अभावी दगावली जातात.

युगांडात लागवड व प्रात्यक्षिकाला सुरवात..

सोनेरी केळीची लागवड व डेंमो प्लॉट तयार करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे. अफ्रिकेतील गरीब समुदायातील लहान मुलांना वाचविण्यात अगामी काळात यश मिळणार आहे.

भारतीय अदिवासी भागाला सोनेरी केळीची गरज 

भारतात अदिवासी पट्ट्यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. रायगड ठाणे पालघर व गडचिरोली भागात अदिवासींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी सोनेरी केळीची नितांत गरज आहे. 

भारतात सोनेरी केळीचे वाण कसे येवू शकते 

सोनेरी केळीची भारतात लागवड करण्यासाठी  कृषी वाण आयात परवाना अवश्यक आहे. ज्या परदेशी व्यक्तीने सदर वाण संशोधीत केले आहे त्या व्यक्तीकडून सदर वाणाची पुर्ण सचित्र माहिती आयातकर्त्याने घेणे अवश्यक आहे. वरील माहिती सोबत भारतीय हवामानातील उपयुक्तता या संदर्भाने २० प्रतींमध्ये केंद्रीय कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. आयात कर्त्यांचा परवाना व भारतीय हवामानातील उपयुक्तता या संदर्भाने अंतिम निर्णय ICAR घेते. त्यानंतर वाणाची आयात करण्याची परवानगी दिली जाते. अर्जाची पडताळणी एकूण २० अधिकारी करतात.

विशाल केदारी 
मो. क्र : ७७१९८६००५८


अधिक बातम्या वाचा...

Blog : का होतोय शेतकरी संतप्त..?

http://www.krushirang.com/2018/10/blog_55.html


Blog : हवामान खाते व स्कायमेट यांचा अंदाज समजून घ्या...

http://www.krushirang.com/2018/10/blog_39.html

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget