DNA Live24 2015

..आता उद्धव ठाकरेंचाही नंबर..!

अहमदनगर :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अहमदनगर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वपक्षणीय दिग्गज नेते नांगराला पायधूळ झाडून जात आहेत. अशावेळी महापालिका ताब्यात घेण्यासह येथील विधानसभेची जागाही पक्की करण्याच्या इराद्याने शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे नगर दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गज नेते नगरच्या दौ-यावर येत आहेत. शरद पवार, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, अजित पवार आदींसह आता नगरच्या राजकारणात आपली (शिवसेनेची) जागा भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबाची दि. २१ ऑक्टोबरला नगर दौ-यावर येत आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत ठाकरेंनी हा निर्णय घेतला. बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे सेनेचे संभाव्य उमेदवार घनश्याम शेलार यांच्या नावावरही चर्चा करण्यात आली.

नगर उत्तर व दक्षिण मतदार संघात लोकसभेचे राजकारण अतिशय अटितटीचे बनले आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात शिवसेना वाढविणे पक्षासाठी अवघड झाले आहे. पक्षांतर्गत निष्फळ राजकारण व वादविवाद पक्षासाठीच मारक ठरत आहेत. हेच संपवून पुन्हा नव्याने शिवसेना जिल्ह्यात बळकट करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

दक्षिण भागातुन घनश्याम शेलार यांच्या नावावर विचार उमेदवारीसाठी होत आहे. यामुळे सेनेचे सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास 'तेलही गेले तुपही गेले', अशी गत सेनेची झाल्याशिवाय राहणार नाही.

(द्वारा : पंकज नाईकवाडे)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget