DNA Live24 2015

'सर्व शिक्षा'च्या पुस्तकात संभाजी राजे यांच्याबाबत वादग्रस्त उल्लेख; संभाजी ब्रिगेड आक्रमक

पुणे :
‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात करण्यात आला आहे.  संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप नोंदवत आक्रमक भूमिका घेतली आहे.

सर्व शिक्षा अभियानात काही पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. यामध्ये धार्मिक विचार पसरविण्यासह खोट्या माहितीलाच इतिहास म्हणून सांगितले जात असल्याचा आरोप होत आहे. त्याचवेळी ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात लेखिका डॉ. शुभा साठे यांनी वादग्रस्त लिखाण केल्याचे समोर आले आहे. नागपूरमधील लाखे प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. पुस्तकातील पान नंबर १८ वर संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख आहे.
‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात आहे. 'संभाजी महाराज दारुच्या कैफात होते', या वाक्यावर संभाजी ब्रिगेड आणि अनेक संघटना आणि विचारवंतांनी आक्षेप घेतला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget