DNA Live24 2015

जनसंघर्ष नव्हे विखे-थोरात संघर्ष..!

अहमदनगर :
राज्यातील काँग्रेस पक्षाच्या अंर्तगत असलेला संघर्ष संपण्याचे काहीच चिन्हे नाहीत. त्यामुळेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेना काहीच कामे न करताही निर्धास्त आहेत. असाच प्रकार पुन्हा एकदा जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात दिसला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील विसंवाद पुन्हा एकदा फ्लेक्सवर झळकला आहे.

त्यामुळेच 'थोरात - विखे हे राष्ट्रीय स्तरावरचे कलावंत आहेत,' असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. मात्र, त्याचवेळी 'वेळ आल्यावर ते एकत्र येतात' अशी कोपरखळीही मारण्यास ते विसरले नाहीत. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी यावर मौन धारण केले. यात्रा नगर जिल्ह्यात असताना प्रत्येक ठिकाणी थोरातांचे आणि विखेंचे फ्लेक्स सेपरेट व एकमेकांसमोरच लावले होते. दोन्ही चव्हाणांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. किमान जनसंघर्ष यात्रेमुळे का होईना विखे-थोरात एकत्र येतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.

विखे-थोरातांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली असली तरी गटबाजीची परंपरा कायम ठेवण्यात त्यांनी कुठलीही कसर ठेवलेली नाही, अशीच प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget