DNA Live24 2015

पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देश

अहमदनगर :
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणीसाठे आरक्षित करण्‍याचे निर्देश राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री  तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.

येथील नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले.  जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती शालिनीताई विखे पाटील, खासदार दिलीप गांधी,  आमदार शिवाजीराव कर्डिले, विजयराव औटी, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, राहुल जगताप, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्‍हाधिकारी प्रशांत पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री भोर आदिची उपस्थिती होती.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget