DNA Live24 2015

वनालगतची १५ हजार ५०० गावे होणार रोजगारक्षम

मुंबई : 
वनालगतच्या १५ हजार ५०० गावांमध्ये रोजगारक्षम कार्यक्रमांची निर्मिती करण्यात येणार असून वित्तीय समायोजनेतून स्थानिकांच्या उत्पन्नांच्या साधनांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती वन सचिव विकास खारगे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि वित्तीय समावेशनाच्या विविध योजना यांच्या माध्यमातून वनक्षेत्रातील आणि वनालगतच्या गावांमध्ये शाश्वत उत्पन्नाची साधने कशाप्रकारे विकसित करता येऊ शकतील यासंबंधीची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी श्री.खारगे बोलत होते. यावेळी उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेतून वनक्षेत्रातील नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. परंतु या कार्यक्रमाला अधिक व्यापक करतांना प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, स्टार्टअप, स्टॅण्ड अप सारख्या वित्तीय योजनांचा लाभ त्यांना दिल्यास वन विभागाच्या या प्रयत्नांना अधिक वेग येईल. यातून मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनांवर मर्यादा येईल. त्यामुळे उमेदने नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत या १५ हजार ५०० गावांमध्ये सर्वेक्षण करून तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा, निसर्ग पर्यटनाचा विचार करून रोजगार संधींचा विशेषत: वनाधारित रोजगार संधींचा शोध घ्या

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget