DNA Live24 2015

अंधारात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..!

पुणे :
'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..?' अशी वादग्रस्त ठरलेली जाहिरातबाजी करूनही निवडणुकीत भाजपला यश मिळाले होते. मात्र, त्यावेळी केलेल्या त्या जाहिरातीच आता भाजपला अडचणीच्या ठरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याचाच आधार घेत 'अंधारात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..' असे म्हणत लोडशेडिंग विरोधात कंदील आंदोलन हाती घेतले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पेजसह या पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या व फॅन क्लबच्या पेजवर याबद्दलच्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. आताही राज्यभर ऐन दिवाळीत भारनियमनाचा चटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यावर नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. विरोधकांनी याच भावनेला हात घालून आपला जनाधार पुन्हा एकदा पक्का करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी सोशल मीडियावर विशेष कॅम्पेन राबविण्यात येत आहे. त्यास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget