DNA Live24 2015

Blog : कोण खोटं, यापेक्षा तिचं म्हणणं महत्वाचं...

'हॉर्न ओके प्लिज' हा सिनेमा मी काही पाहिलेला नाही. आणि पाहण्याची गरजही नाही. ओघाने पाहायलाच मिळाला युट्युब किंवा टीव्हीवर तर नक्कीच पाहीन. तर, मुद्दा तो नाहीच. मुद्दा हा आहे की, तनुश्री दत्ता काय म्हणतेय. तिला का ट्रोल करून खोटं ठरविलं जातंय..?

अभिनेता नाना पाटेकर यांच्याबद्दल आदर असणे साहजिक आहे. उत्तम अभिनयासह नाम फाउंडेशन संस्थेतर्फे त्यांनी हा सामाजिक आदर मिळविला आहे. म्हणून ते चुकू शकत नाहीत असेही नाही.

आपल्याला लेबलिंग करण्याची सवय आहे. त्यानुसार काही अभिनेते ग्रेट आणि सर्वच अभिनेत्री 'तसल्याच', हे आपले आपले गृहीतक पक्के आहे. भारतीय समाजात नैतिकता हा शब्द बोलाची कढी आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झालेय. आताही तनुश्री हिचे म्हणणे काय आहे, तिला का असे बोलावे वाटतेय, तिने त्यावेळी काय मानसिक दडपण सोसले असेल आणि आताही तिलाच मादी म्हणून हिणावून समाज नेमकं काय सिद्ध करतोय, असे प्रश्न मनात येतात.

आपल्याकडे वाल्मीकीकरण छाप योजना किंवा पापे धुवून पुन्हा उजळ माथ्याने फिरण्याच्या योजना या संस्कृतीचा भागच आहेत. मात्र, यातही महिलांना अशा योजनांचा लाभ घेण्याचा हक्क नाही. तसेच महिला उंबरठा ओलांडून बाहेर पडली म्हणजे ती 'तसलीच' असते हा समजही दृढ आहे.

अशा विचित्र परिस्थितीत 21 व्या शतकातही बदल झालेला नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे तनुश्री-नाना प्रकरण. नाना यास क्लिनचिट देऊन यात महिला (किंवा अभिनेत्री) म्हणून तानुश्रीला आधील बदनाम करण्याचा डाव आखला जातोय. यात नाना जर आरोपी नसतील (त्यांचा दावा मान्य केलाच तर) तर त्यांनी किमान एकदा तरी आवाहन करावे की, हा नाना-तनुश्री यांचा प्रश्न आहे. उगीच तिला ट्रोल करून छळू नका.

उलट नाना पाटेकर यांची ट्रोलिंग फळी दिवसेंदिवस जोरात सक्रिय होत आहे. एका सामाजिक महिलेला 'तसलीच' ठरविण्याचा कुटील डाव हा 'आधुनिक भारतीय समाज' आखतोय. आणि विशेष म्हणजे महिला संघटना व विचारी महिला याप्रकरणी गप्प राहतात, हे विशेष...

नाना की तनुश्री खोटे? दोघांपैकी खरे कोण? हे त्या दोघांना चांगलेच ठाऊक आहे. पण काहीच माहिती नसताना ऐकीव माहितीवर महिलेची बेअब्रू करायला नानाप्रेमींना लाज कशी वाटत नाही, हा खरा प्रश्न आहे...

@माधुरी चोभे,
अहमदनगर
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget