DNA Live24 2015

Blog : गांधी म्हणजे...


महात्मा गांधी... कांहीही टिका करा, कितीही अश्लाघ्य भाषेत! ज्यांना टिका करायची आहे, त्यांना मुद्दे शोधायचा त्रास होऊ नये याचीही काळजी घेऊन  स्वत:वर टिका करायची पुर्ण रसद स्वत: त्यांनीच पुरवली आहे. कुठलाही आडपडदा न बाळगता वैयक्तिक माहीतीतील मजकूरही त्यांनी लोकांसमोर ठेवला! 

आपल्या विरोधकांना स्वत:ची हत्या करण्याचेही कष्ट पडू नये म्हणून अनेकवेळा प्राणांतिक उपोषणही केले! पण कोणीही त्यास उपोषणात मरू दिले नाही, शेवटी छातीवर बंदुकीच्या झेलूनच मरावे लागले! 

हाडामासांचा हा कृश माणूस! स्वत:ला मारायला आलेल्या मारेक-यालाही माफ करणारा! त्यांची हत्या झाल्यावर त्यांच्या मुलांनीही मारेक-याला माफ करण्याचीच मागणी केली! 

पण गांधींही माणूस होता म्हणून त्यांस  कोणी माफ करायला तयार नाही. कोणीही कितीही आरोप करावे, शिव्या द्याव्या! सर्व आरोप, शिव्या, अपशब्द सर्व कांही मान्य! गांधींचे पुतळे तोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तरीही कोणी विरोॆध करू नका!  कोणी कांहीही केले तरी न दंगा होणार ना कोणी हिंसक प्रतिक्रीया देणार! 
गांधीजींच्या समर्थनार्थ ना त्यांच्या जातीधर्माचे येणार, ना त्यांच्या प्रांतातील येणार!  एखाद्या व्यक्तीच्या स्वजातीधर्मातील लोक जेंव्हा  विरोध करतील तेंव्हा समजून चालायचे की, हा माणूस जातीधर्मापलिकडे पोचला आहे!

© राज कुलकर्णी
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget