DNA Live24 2015

IMP : ज्वारी लागवड तंत्रज्ञान

रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन करण्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झालेल्या क्षेत्रात श्रावणी पोळ्यानंतर ज्वारीची पेरणी सुरू होते. तर, मराठवाडा भागात आता पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होणार आहे.

ज्वारी या पिकाच्या लागवडीचे तंत्र समजून घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे. रब्बी ज्वारी पेरणीसाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांनी विभागनिहाय शिफारस केलेल्या सुधारित जातींची निवड करावी. हलक्‍या जमिनीसाठी सिलेक्‍शन-3, फुले अनुराधा या जातीचे वाण वापरावे. तर, मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी ३५-१ आणि भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. २२, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती निवडाव्यात.

हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी. पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत पेरणी पूर्ण करावी. त्यासाठी प्रतिहेक्‍टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (३०० मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी ४५ x १५ सें.मी. अंतर ठेवावी. ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा. गरजेनुसार खात व पाणी व्यवस्थापन करावे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget