DNA Live24 2015

IMP : करडई लागवड तंत्रज्ञान

रब्बी हंगामात ज्वारीसमवेत करडई पिकाची पेरणी केली जाते. तसेच काही शेतकरी अंतरपिकाऐवजी फक्त करडई पिकाची लागवड करतात. सर्वोत्तम खाद्य तेल म्हणून करडई तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

करडई पेरणीसाठी सुधारित जातींची निवड करावी. फुले एसएसएफ ७३३ ही जात १२०-१२५ दिवसांत तयार होते. याचे उत्पादन प्रति हेक्‍टरी १३ ते २९ क्विंटल इतके मिळते. ही जात मावा किडीस प्रतिकारक्षम आहे. तसेच जिराईत क्षेत्रासाठी चांगली आहे. त्याचबरोबर एसएसएफ ६५८ ही बिनकाटेरी जात आहे. या जातीचे प्रति हेक्‍टरी उत्पादन १४ ते १५ क्विंटल आहे. जिरायती क्षेत्रावर या जातीची लागवड करावी. भीमा ही जात १३० ते १३५ दिवसांत तयार होते. प्रति हेक्‍टरी या जातीचे १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. डी.एस.एच.१२९ ही जात १२५ ते १३० दिवसांत तयार होते. या जातीचे प्रतिहेक्‍टरी १८ ते २० क्विंटल इतके मिळते.

एस.एस.एफ. ७०८ ही जात ११५ ते १२० दिवसांत तयार होते. या जातीचे जिरायतीमध्ये प्रति हेक्‍टरी १३ ते १५ क्विंटल आणि बागायतमध्ये २० ते २२ क्विंटल उत्पादन मिळते. पुणे जिल्ह्यातील जिरायती व ओलिताच्या क्षेत्रासाठी फुले कुसुमा (जेएलएसएफ- ४१४) या जातीची लागवड करावी. ही जात १३५ ते १४० दिवसांत तयार होते. या जातीचे हेक्‍टरी जिरायती भागात १२ ते १५ क्विंटल व बागायती परिस्थितीत १५ ते १७ क्विंटल उत्पादन मिळते. 

करडईचे सलग पीक घ्यावे. लागवडीसाठी हेक्‍टरी १० ते १२ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. पेरणी उशिरात उशीर १० ऑक्‍टोबरपूर्वी पूर्ण करावी. पेरणी ४५ सें.मी. अंतराच्या पाभरीने करावी. बियाणे पाच ते सहा सें.मी. खोलीवर पडेल अशी काळजी घ्यावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. दोन झाडांतील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget