DNA Live24 2015

IMP : मोबाईलचा 'आधार' संपला; घटस्फोट झाला शक्य..!

मुंबई :
मोबाईल नंबरला आधार कार्ड जोडण्यासाठी जोरदार दबाव टाकणाऱ्या सरकारी यंत्रणांना चपराक देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. त्या निर्णयानुसार आता मोबाईल क्रमांकाचा फक्त आधार संपला नसून बेकायदा जोडणी केलेल्या आधार-मोबाईल नंबरचा घटस्फोट घेण्याचीही मुभा ग्राहकांना देण्यात आली आहे.

सरकारी कृपेने आधार-मोबाईल जोडणीतून कंपन्या व बहुसंख्य ठेकेदारांनी कोट्यवधींची वरकमाई केली. मात्र, आता हा निर्णय बेकायदेशीर ठरला आहे. त्यानुसार आता मोबाईल व आधार यांची एकमेकांशी असणारी जोडणी डी- लिंक करण्याची मुभा ग्राहकांना मिळाली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) सोमवारी टेलिकॉम कंपन्यांना १५ दिवसांत आधार – मोबाईल क्रमांक डि- लिंक करण्यासाठी प्लॅन सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. या पात्रात म्हटले आहे की, ‘सर्व कंपन्यांनी २६ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलावित. सर्व कंपन्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत आधार- मोबाईल क्रमांक डि- लिंक करण्यासंदर्भातील अॅक्शन प्लॅन सादर करावा.'

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget