DNA Live24 2015

#metoo शेतकरी व शेतमजूर महिलाही असमानतेच्या बळी..!

पुणे :
देशभरात सध्या #metoo नावाचे वादळ घोंगावत असतानाच शबरीमाला मंदिरासह बहुसंख्य ठिकाणी महिलांना दर्शनाचीही मुभा मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. चित्रपट तारका आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिलांना लैंगिक असमानतेमुळे भोगाव्या लागलेल्या प्रकरणांना आता #metoo या अभियानामुळे मोकळी वाट मिळाली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर हेही याप्रकरणी टीकेचे धनी ठरले आहेत. तर, पुण्यातील सिम्बायोसिससारख्या संस्थेबद्दलही असेच प्रकरण पुढे येत आहे. अशावेळी ग्रामीण भागातील महिला, शेतकरी आणि शेतमजूर महिला यांनाही अशाच प्रकारचा अनुभव येत असल्याची बातमी 'द टेलिग्राफ' या पोर्टलने देऊन खळबळ उडवून दिली आहे.

ग्रामीण भागाचे वास्तव मांडण्यात भाषिक आणि राज्यस्तरीय माध्यमे कमी पडत असल्याचे बोलले जाते. यानिमित्ताने हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 'द टेलिग्राफ'च्या दिल्ली येथील प्रतिनिधी बसंत कुमार मोहंती यांनी यावर #wetoo हे विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे. इंग्रजी वाचकांमध्ये सध्या ही बातमी जोरात ट्रेंडिंग होत आहे. शहरी भागाच्या तुलनेत महिलांना ग्रामीण भागात असमानतेची वागणूक देण्याचे प्रकरण टक्केवारीने जास्त आहेत. शेतमजूर म्हणून रोजगार देतानाही ग्रामीण महिलांवर अन्याय होत असतो. पुरुषांच्या तुलनेत त्यांना रोजंदारी कमी मिळते. तसेच गरीब महिलांना आर्थिक कारणांमुळे जमीनदार आणि त्याच्या कुटुंबातील मंडळींकडून अत्याचारही सहन करावे लागतात. मानसिक आणि शारीरिक अत्याचार सहन करूनच या महिलांना शेतात रोजंदारीवर जावे लागत असल्याचे वास्तव आहे. याच वास्तवाला 'द टेलिग्राफ'ने थेट हात घातला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget