DNA Live24 2015

सायबर लॉ : मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे दि. 2 डिसेंबरला आयोजन

अहमदनगर :
वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, तपास पद्धती, कायदेशीर आणि तांत्रिक गोष्टींचा अभ्यास आवश्यक झाला आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर मधील मॅट्रिक्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने रविवार दि.2 डिसेंबर रोजी सायबर लॉ या विषयावर मोफत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सायबर लॉ चा अभ्यास करणार्‍यांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कावरे हाईट, बंगालचौकी (माळीवाडा) येथील मॅट्रिक्स अ‍ॅकॅडमीच्या सभागृहात दु.4 वा. ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. यामध्ये विधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असून, प्रात्यक्षिक तपास, कार्यपद्धतीचे रीतसर अवलोकनाचा यामध्ये समावेश असणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. संस्थेचे समन्वयक विजय मिसाळ यांना दि.30 नोव्हेंबर पर्यंन्त मो.नं. 7517045777 व 7517245777 या नंबरवर संपर्क साधून नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अ‍ॅकॅडमीच्या वतीने पुढील 6 महिन्यांकरिता सायबर लॉ च्या सविस्तर प्रशिक्षणाची माहिती दिली जाणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget