DNA Live24 2015

मनशक्ती प्रयोग केंद्रा व्दारा 21 ते 23नोव्हेंबर दरम्यान व्याख्यान

अहमदनगर :
लोणावळा येथील जगप्रसिध्द असलेल्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या वतीने प्रत्येक वर्षी राज्याच्या विविध शहरांमध्ये ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते.यंदाच्या वर्षी या यात्रेचे 19 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत अहमदनगर शहरा सहीत 8 शहरांमध्ये आयोजन करण्यात आले आहे.ज्ञानप्रकाश यात्रेच्या काळात नगर शहरात 21 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत एका महत्वपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.मनशक्ती केंद्राचे तज्ञ साधक या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती नाशिक केंद्राचे साधक दत्तात्रय कुलकर्णी व नगर केंद्राच्या संचालिका श्रीमती पटारे यांनी दिली आहे.

नगर शहरात गुलमोहोर रस्त्यावर जॉगिंग पार्क शेजारी असलेल्या खंडोलवाल सांस्कृतिक भवनात 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये 21 नोव्हेंबर रोजी तन आणि मनाचे सर्वांगीण  आरोग्य,22 नोव्हेंबर रोजी मत्सरपात व वास्तुशुध्दी,23 नोव्हेंबर ला सुजाण पालकत्व या विषयांवर तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. मानवी जीवनातील दु:ख दूर करून सुख प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने मनशक्ती केंद्राच्या मार्फत केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्या कृतता स्मरणदिना निमित्त 19 नोव्हेंबर पासून राज्यात अहमदनगर सहीत पालघर,सावंत वाडी,सोलापूर,खारघर,इचलकरंजी, भुसावळ व लोणावळा या ८ शहरांमध्ये ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.तणावमुक्ती,मत्सराचे दुष्परिणाम,परिवाराचे सुख आणि शांती,मनोधैर्यासाठी ध्यान इच्छापूर्तीसाठी ज्योतीध्यान,मुलांचा सर्वांगीण विकास,अभ्यास यशाच्या युक्त्या,तारूण्यातील महत्वाकांक्षा,विद्यार्थी समस्या व उपाय अशा विविध विषयांवर संस्थेकडून पूर्णपणे मोफत मार्गदर्शन केले जाते.वेगवेगळ्या संस्था, ऑफिसेस,कारखाने,बँका,बचत गट,पोलीस स्टेशन,ज्येष्ठ नागरिक संघ,शाळा,महाविद्यालये,खासगी क्लासेस अशा संस्थांमध्ये मनशक्ती केंद्राचे साधक स्वत: जाऊन मार्गदर्शन करतात.प्रत्येक ठिकाणी 1 तासाचे मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी व मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दत्तात्रय कुलकर्णी (9850950627 / 9850950672) व श्रीमती पटारे (9096244445 / 9422307711) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget