DNA Live24 2015

लसीकरण मोहिम 27 नोव्‍हेंबरपासून सुरु

अहमदनगर :
महानगरपालिका कार्यक्षेत्रात  गोवर-रुबेला लसीकरण मोहिम 27 नोव्‍हेंबर 2018 पासून  सुरु होत आहे. त्‍यासाठी सुक्ष्‍मकृती आराखडा तयार करण्‍यात आला आहे. अहमदनगर शहर व कटक मंडळ भिंगार  कार्यक्षेत्रामध्‍ये  मोहिमेच्‍या  आयोजनाकरिता लस टोचकांची नियुक्‍ती करण्‍यात आला आहे. सुरुवातील सर्व शाळेतील मुलांना लस देण्‍यात येणार असून त्‍यानंतर  संबंधीत  नागरी आरोग्‍य केंद्र,  अंगणवाडया व उर्वरीत लाभार्थ्‍याना लसीकरण करण्‍यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन जानेवारी 2019 च्‍या पहिल्‍या आठवडयापर्यत करण्‍यात आले असून  यामध्‍ये 1 हजार 196 सत्रांद्वारे जवळपास 1 लाख 25 हजार 670  लाभार्थ्‍याना  या मोहिमेमध्‍ये लसीकरण करण्‍यात येणार आहे. नागरी आरोग्‍य केंद्र व पर्यवेक्षक पुढीलप्रमाणे  महात्‍मा फुले डॉ. नलिनी थोरात, डॉ.आरती डापसे, तोफखाना डॉ. सुजाता साळवे, डॉ. आयेशा शेख, मुकूंदनगर डॉ. प्रदीप काळपुंड,  केडगाव डॉ. गिरीष दळवी, जिजामाता डॉ. अश्विनी मरकड, सिव्‍हील डॉ. शिल्‍पा चेलवा,  कॅन्‍टोनमेंट हॉस्‍पीटल भिंगार डॉ. एस.आर जयस्‍वाल, डॉ. रुपाली कुलकणी,  नागापूर डॉ कविता माने असे आहेत.  संबंधीतांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्‍यावा असे अहमदनगर महानगरपालिका यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget