DNA Live24 2015

महाराष्ट्रातील 5 मोठ्या शहरात 2 कोटी फेसबुक युजर्स

संशोधन हा माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळेच मी सतत काहीतरी शोधत असतो. माझे पहिले-वहिले संशोधन अगदी साध्या-सोप्या भाषेत मी आपणासमोर सादर करत आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांमधील मराठी भाषा अवगत असणा-या फेसबुक युजर्सच्या आकडेवारीचा मी अभ्यास केला आहे. या अभ्यासासाठी फेसबुकवर सशुल्क जाहिरात (Paid advertisement) करताना मिळणा-या Potential Reach या सुविधेचा वापर केला आहे.

ही माहिती मराठी भाषेचे प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, मराठी भाषा प्रेमी, माध्यमकर्मी तसेच इतरांनाही उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.  संशोधनाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने काही त्रुटी असण्याची शक्यता आहे.  या क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्रुटी दाखवून द्याव्यात ही विनंती.

प्रमुख निष्कर्ष
• मुंबईमधील एकूण फेसबुक युजर्सच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षाही कमी युजर्स मराठी भाषिक आहेत.
• इतर चार शहरांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये मराठी भाषिकांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे
• पुण्यातील ४४ % पेक्षा अधिक फेसबुक वापरकर्ते हे अमराठी आहेत.
• मुंबईनंतर सर्वाधिक अमराठी भाषिक नागपूरमध्ये तर त्यानंत पुण्यामध्ये आहेत.

- व्यंकटेश कल्याणकर

Reference:  facebook.com

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget