DNA Live24 2015

गुरुनानक देवजी यांची 549 वी जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर :
बोले सो निहाल, सत श्री अकाल... चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात गुरुद्वारा भाई दयासिंगजी गोविंदपुरा येथे गुरुनानक देवजी यांची 549 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंजाबी, शीख व सिंधी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जयंती निमित्त अमृतसर येथून आलेले भाईसाहेब हरचरणसिंग जथ्था यांच्या किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. किर्तनातून त्यांनी गुरुनानक देवजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. गुरुनानक देवजी यांनी शीख धर्माची स्थापना करुन अखंड मानवजातीचा संदेश दिला. तसेच लंगर सेवेचा पाया त्यांनी रचला. ज्याची सेवा आज जगभरात चालू असून, अनेक गरजू घटक त्याचा लाभ घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गुरुद्वार्‍याचे हजुरी जथ्थाचे भाईसाहेब अनिलसिंग व भाईसाहेब गुरभेजसिंग यांनी कथा-प्रवचनातून गुरुनानक यांच्या शिकवणीचा संदेश दिला. माताजी प्रितमकौर चावला यांनी सादर केलेल्या भजनात भाविक तल्लिन झाले होते.

 स्व.बिशनदास व राजकुमारी पंजाबी यांच्या स्मरणार्थ पंजाबी परिवाराच्या वतीने तारकपुर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आहुजा यांना गुरुनानक समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व 5 हजार एक रुपये या पुरस्कारचे स्वरुप आहे. गुरुद्वारा येथे थायरॉईड, किडनी विकार आदिंच्या मोफत चाचण्या हिंद लॅबोरेटरीच्या वतीने भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. 
जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय व्यक्ती हजर होते. पाहुण्यांचे स्वागत गुरुद्वार्‍याचे अध्यक्ष गुरुद्यालसिंग वाही यांनी केले. यावेळी गुरभजनसिंग नारंग, रविंदर नारंग, हरजितसिंह वधवा, प्रणितसिंग नारंग, गुरुभिरसिंग नारंग, राजेंद्र चावला, मेजर चावला, अमरजितसिंग वधवा, प्रिटीसिंग ओबेरॉय, मनमोहनसिंग सरना, तरण नारंग, जी.एस. वीरदी, अजय पंजाबी, विजय पंजाबी, चमनलाल कुमार, हितेश कुमार, हरविंदरसिंग नारंग, लकी वाही, राजू मक्कर, सिमरजितसिंग वधवा, अजितसिंग वधवा, विकी मल्होत्रा, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, टोनी मक्कर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतींदरसिंग नारंग यांनी केले. लंगरने कार्यक्रमाची सांगता झाली. जयंती निमित्त गुरुद्वार्‍यात तीन दिवसापासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अखंडपाठ साहेब, मोटारसायकल रॅली, किर्तन दरबार व लंगरचा समावेश होता. तसेच शहरातील तारकपुर येथील कुंदनलालजी गुरुद्वारा, एसी डेपो गुरुद्वारा, सेंट्रल गुरुद्वारा भिंगार येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget