DNA Live24 2015

'संतूर-कोलगेट'पेक्षा BJP चा जाहिरात खर्च महान..!

दिल्ली :
2012 पासून देशात मोदी लाट आल्याचे बोलले जात असले तरी ही लाट आपोआप आली नसून माध्यमांनी ठरवून आणल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 'बार्क'च्या अहवालानुसार नोव्हेंबर 10 ते 16 या कालावधीत नेटफ्लिक्स, संतूर, कोलगेट, ट्रीवागो, ऍमेझॉन यांच्यापेक्षाही जास्त कालावधीचा स्लॉट भारतीय जनता पार्टी (भाजप / BJP) यांनी खरेदी केला होता.

या अहवालानुसार देशातील सर्वात मोठे जाहिरातदार क्लायंट जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यात भाजप या सत्ताधारी राजकीय पक्षाने सर्व मोठ्या कंपन्यांना मागे टाकीत आघाडीवर राहून देशात मोदी लाट पसरविल्याचे स्पष्ट झाले आहे. शिकलेले, अर्धशिक्षित व मध्यमवर्गीय पुरुष व महिला या जाहिरातीच्या जाळ्यात सापडून देशात मोदी लाट आणि भाजपचे सरकार देशात व महाराष्ट्र राज्यात स्थानापन्न झाल्याचा हा थेट परिणाम जाहिरातीने साधला आहे. अजूनही केंद्र सरकार व भाजप यांची जाहिरातीच्या क्षेत्रात मक्तेदारी कायम आहे. मात्र, त्याचवेळी त्यांचा मतदारांचा पाया कमकुवत होत आहे हेही अनेक सर्वेक्षण संस्थांनी जाहीर केले आहे. एकूणच पुढील काळ हा भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष अमित शाह यांच्या टीमसाठी कसोटीचा असेल हे निश्चित.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget