DNA Live24 2015

निवडणुकीचा झटका; कांदा उत्पादकांना फटका

अहमदनगर :
लोकसभा निवडणुकीची झलक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाल्या आहेत. मात्र, त्याचवेळी या निवडणुकीचा झटका महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या एकाच फटक्यामुळे उत्पादक समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत.

मागील चार वर्षांपासून मोदीप्रणीत भाजप फक्त निवडणुकीच्या मूडमध्ये आहे. त्यामुळेच 2022 आश्वासने देत हा पक्ष निवडणुकांवर निवडणुका जिंकत आहे. त्यात वेगवेगळे जुमले वापरत आहे. मात्र, आता हेच जुमले अंगलट आल्याने या निवडणुकीच्या तोंडावर जीवनावश्यक मानल्या जाणाऱ्या कांद्याचे भाव कमी ठेवण्याकडे केंद्राचा कल आहे. परिणामी बाजारात वाढत असलेले कांद्याचे भाव एकाएकी कोसळले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. यापूर्वीही गुजरात निवडणुकीच्या तोंडावर कांदा खरेदी न करण्याचा सल्ला केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना दिला होता. त्याचीच आठवण आता यानिमित्ताने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा होत आहे. शहरी मध्यमवर्ग खुश ठेवण्याच्या नादात भाजपकडून शेतकऱ्यांवर घोर अन्याय होत असल्याची भावना ग्रामीण भागात आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget