DNA Live24 2015

शेतकऱ्यांनो काळजी करू नका : पालकमंत्री मुंडे

बीड : 
पावसाने जरी पाठ फिरवली असली तरी काळजी करू नका, शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन आहे. पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

परळी तालुक्यातील दगडवाडी, टोकवाडी, तडोळी गावांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली आणि संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.

यावेळी तहसिलदार शरद झाडके, कार्यकारी अभियंता श्री.काकडे, शिवाजीराव गुठ्ठे, श्रीहरी मुंडे, राजेश गिते, आबा बिडगर, प्रा.बिबीशन फड, भीमराव मुंडे, रवी कांदे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दगडवाडी येथील शेतकरी प्रभू मारुती यमगर यांच्या शेतीस भेट देऊन कापूस पिकाची पाहणी केली. त्यानंतर टोकवाडी येथील तुकाराम सोनाजी भांगे यांच्या शेतीला भेट देऊन कापूस सोयाबीन मूग मका या पिकाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच तडोळे येथील बाळासाहेब रामभाऊ जाधव यांच्या कापूस पिकाची तर माणिकराव वामनराव सातभाई यांच्या उसाच्या शेतीस भेट देऊन पाहणी केली व त्यांच्याकडून झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती जाणून घेऊन शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन आपल्या पाठीशी आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेणार आहे. तसेच जिल्ह्यातील झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेऊन ती माहिती शासनाकडे सादर करणार असल्याचे श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

@'महान्यूज' 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget