DNA Live24 2015

म्हणून त्याने चोराला अंड्यांचा ट्रक..!

मुंबई :
अंबरनाथ-बदलापूर या महामार्गावरुन जाणारा अंडयांनी भरलेला ट्रक पळवण्याच्या गुन्ह्यात धक्कादायक माहिती पुढे अली आहे. ठाणे पोलिसांनी या विचित्र गुन्ह्याची उकल केली. कर्जबाजारी झाल्याने आरोपींनी सदरचा दीड लाख अंड्यांचा ट्रक चोरल्याची माहिती पुढे आली आहे.

याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणी एकास अटक केली आहे तर, अन्य तीन आरोपी फरार आहेत. या ट्रकमध्ये १ लाख ४० हजार नग म्हणजेच ४ लाख ७० हजार रुपयांची अंडी होती. ती पोलिसांनी जप्त केली आहेत. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अंडयांनी भरलेल्या ट्रकच्या पुढे एक कार थांबवून त्या कारमधील चार टोळक्याने ट्रकचालक व मुलगा यांना मारहाण केली. तसेच नंतर त्यांना कारमध्ये बसवून आणि डोळ्यांना पट्टी बांधून टिटवाळ्याजवळच्या जंगलात नेऊन सोडून दिलं. त्यांच्याजवळचा मोबाईल आणि पैसेही चोरट्यांनी काढून घेतले नंतर अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन पलायन केलं.

आरोपींनी २२ हजार अंडी बाजारात विकली. सादात असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. व्यवसायात मोठे नुकसान सोसावे लागल्याने कर्जबाजारी झालो म्हणून हा अंड्याची ट्रक चोरण्याचा प्लॅन केल्याचे त्याने पोलिसांकडे मान्य केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget