DNA Live24 2015

शहीद सैनिकांच्‍या वारसदारांना मिळू शकते सरकारी जमीन

अहमदनगर  :
भारतीय सैन्‍यदलात किंवा सशस्‍त्र  दलामध्‍ये कार्यरत असणा-या आणि या राज्‍यातील अधिवासी असणा-या जवानास अथवा अधिका-यास कोणत्‍याही युध्‍दजन्‍य परिस्थितीत किंवा कोणत्‍याही लष्‍करी  कारवाईत वीरमरण आल्‍यास, अशा जवानाच्‍या अथवा अधिका-याच्‍या विधवा पत्‍नीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसाला  निर्बाधरित्‍या वाटपासाठी उलपब्‍ध असलेली नेमून देण्‍यायोग्‍य  जमीन, कृषी  प्रयोजनासाठी, भोगाधिकार मुल्‍य  रहित, विना लिलाव प्रदान करणे शक्‍य होणार आहे.

अहमदनगर जिल्‍हयातील शहीद सैनिकांच्‍या वारसांना कळविण्‍यात येते की, ज्‍या शहीद जवानांच्‍या कायदेशीर वारसांना शासनामार्फत यापूर्वी जमीन मिळालेली नाही. अशा कायदेशीर वारसांनी संबंधित तहसीलदार यांचे कार्यालयाशी संपर्क साधून त्‍याचेकडील लॅन्‍ड बँकनुसार निर्बाधरित्‍या  उपलब्‍ध असलेल्‍या शासकीय जमिनीची माहिती प्राप्‍त करुन घेऊन त्‍यानुसार त्‍यांना आवश्‍यक  असलेल्‍या शासकीय जमिनीच्‍या सविस्‍तर माहितीसह जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, अहमदनगर यांचेकडे अर्ज सादर करावा असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी  भानुदास पालवे यांनी केले आहे.

भारतीय सैन्‍यदलात किंवा सशस्‍त्र  दलामध्‍ये कार्यरत असणा-या आणि या राज्‍यातील अधिवासी असणा-या जवानास अथवा अधिका-यास  कोणत्‍याही युध्‍दजन्‍य परिस्थितीत किंवा कोणत्‍याही लष्‍करी  कारवाईत वीरमरण आल्‍यास, अशा जवानाच्‍या अथवा अधिका-याच्‍या विधवा पत्‍नीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसाला निर्बाधरित्‍या वाटपासाठी उलपब्‍ध असलेली नेमून देण्‍यायोग्‍य जमीन, कृषी प्रयोजनासाठी, भोगाधिकार मुल्‍य रहित, विना लिलाव प्रदान करण्‍याबाबत  शासनाने  निर्णय  घेतला असून याबाबत महाराष्‍ट्र  जमीन  महसूल (सरकारी जमिनींची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 चे नियम 11 नंतरपुढे पोट-निय‍म 11अ  समाविष्‍ट  करण्‍याच्‍या अनुषंगाने दिनांक 3 एप्रिल 2018 रोजी महाराष्‍ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना महाराष्‍ट्र शासनाच्‍या राज्‍यपत्रात प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. सदर अधिसूचना महाराष्‍ट्र  शासनाच्‍या www.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर कायदा/ नियम या शिर्षकाखालील माहितीसाठी  उपलब्‍ध आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget