DNA Live24 2015

आसुडाचे फटके ओढीत वोटमाफिया आसूड कावा आंदोलन

अहमदनगर : 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर मते खरेदी करुन निवडून येणार्‍या भ्रष्ट उमेदवाराच्या प्रतिकात्मक पुतळ्यास झाडाला बांधून आसुडाचे फटके ओढीत वोटमाफिया आसूड कावा आंदोलन करण्यात आले. हुतात्म्यांना साक्षी ठेऊन लोकजागृतीसाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात हे आंदोलन करण्यात आले. मत विकणारा व मत खरेदी करणार्‍यांना भारतद्रोही असल्याची यावेळी घोषणा करण्यात आली. 

कॉ.बाबा आरगडे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास अभिवादन करुन या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, बाबासाहेब आरगडे, अशोक भोसले, आकाश भालेराव, पोपट भोसले, हिराबाई ग्यानप्पा, गणेश भोसले, नामदेव अडागळे, नंदू चव्हाण, अशोक उमाप, महेश भोसले, आकाश काळे, सोनू गायकवाड, सुनिता साबळे, शारदा जंगम, नंदा मोरे, फरिदा शेख, शारदा गायकवाड आदि सहभागी झाले होते.

महापालिका निवडणूकीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार व मतदारांनी मतांसाठी पैश्याची सुरु केलेल्या देवाण-घेवाणीने लोकशाही विक्रीस निघाली आहे. नागरिकांनी आपले सत्व विक्रीला काढले असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. भ्रष्टाचाराने सत्ता काबीज करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी व मतदारांमध्ये जागृती आनण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
कॉ.बाबा आरगडे म्हणाले की, निवडणुका भ्रष्ट मार्गाने मत खेरेदी-विक्रीतून होत असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला भारत अधोगतीकडे जात आहे. भ्रष्ट उमेदवारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी मतदारांमध्ये जागृतीची आवश्यकता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड.कारभारी गवळी म्हणाले की, लोकशाहीत जाती, धर्माचे भांडवल करुन, पैश्याच्या जोरावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.  एका-एका उमेदवाराने कोट्यावधी रुपये खर्चाची तयारी ठेवली आहे. हे उमेदवार निवडून आल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्‍न न सोडविता स्वत:चे हित साधणार आहेत. या निवडणुकीत मते विकत घेण्याची स्पर्धा लागली असून, भ्रष्ट उमेदवारांना गनिमी काव्याने निवडणुकीत पाडून चांगले उमेदवार निवडून आनण्याचे त्यांनी आवाहन केले. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget