DNA Live24 2015

मंदिर नव्हे रामराज्य हवे; राज ठाकरे यांचे फटकारे

मुंबई :
'मंदिर वही बनायेंगे'चा नारा देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भाजपने देशाची सत्ता काबीज केली आहे. मात्र, मंदिराचा प्रश्न कायम असतानाच आता शिवसेना या मित्रपक्षानेही आयोध्या विवादात उडी घेतली आहे. मंदिर बांधण्याच्या राजकीय श्रेयाची ही लढाई त्यामुळे चर्चेत आहे. यावरच नेमके बोट ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्टून जारी करीत भाजपा, शिवसेना व संघप्रणित संघटनांना फटकारले आहे.

पावन भूमी अयोध्या येथे विवादित जागेवर मंदिर कोण मारणार व कधी बांधणार याबद्दल शिवसेना व भाजपमध्ये जोरदार चुरस सुरू झाली आहे. धार्मिक राजकारणाची किनार असलेल्या या प्रश्नामुळे देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे यास राजकीय फोडणी मिळाली आहे. या दोन मित्रपक्षांमधील ही लढाई अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. त्यावर नेमके बोट ठेऊन राज ठाकरे यांनी कार्टुन प्रसिद्ध केले आहे. सोशल मीडियात ते जोरात ट्रेंड होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget