DNA Live24 2015

इलाक्षीमध्ये मोफत सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

अहमदनगर :
देशातील सर्वात मोठी पॅसेंजर कार निर्यातक आणि मोटार उत्पादक कंपनी असलेली ह्युंदाईने अठराव्या वर्षी मोफत मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन केले आहे. हा सर्व्हिस कॅम्प शहरातील इलाक्षी ह्युंदाई शोरूममध्ये दि.21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती शोरुमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी दिली.

ग्राहक जोडणी व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने हा कार्यक्रम देशातील सर्व ह्युंदाई शोरुममध्ये होणार आहे. नगर मधील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये होणार्‍या या कॅम्पचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक उमेश चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. 

 या मेगा सर्व्हिस कॅम्पमध्ये फ्री कार केअर क्लीनिक इंजन, ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल सिस्टम, अंडर बॉडी, एसी आदी कारच्या विविध भागांची तपासणी केली जाणार आहे. तसेच ग्राहकांना स्पेअरपार्ट शुल्क, श्रमशुल्क आणि इतर मूल्यवर्धित सेवांवर सवलत देण्यात आली आहे. विस्तारित वॉरंटी आणि रोडसाइड सहाय्यक कार्यक्रमावर आकर्षक सवलत तर तीन वर्षापेक्षा जास्त काळावधी झालेल्या वाहनांसाठी आकर्षक सवलत देण्यात येणार आहे. तसेच सावेडी व एमआयडिसी परिसरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इलाक्षी ह्युंदाईने (एच प्रॉमिस शाखा) सावेडी नाका येथे दि.18 नोव्हेंबर रोजी मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन केले आहे. या दोन्ही कॅम्पचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन इलाक्षी ह्युंदाई शोरुमच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget