DNA Live24 2015

मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस आज दर्शनास खुले

अहमदनगर :
मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) म्हणून बुधवार दि.21 नोव्हेंबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी बुधवारी खुले केले जाणार आहेत. तसेच यावेळी विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या पवित्र केसाच्या दर्शनासाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन येथील पुजारी सय्यद बुर्‍हाण कादरी चिश्ती यांनी केले आहे.  

देशात सात ते आठ ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केस आहे. यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, नागोर, बडीखाटू (राजस्थान), मध्यप्रदेश, काश्मीर आणि तुर्कस्तान देशातील आस्तंबूल या शहरांचा समावेश आहे. नगरच्या मोघल कालीन इतिहासात हजरत महंमद पैगंबराच्या पवित्र केसांचा उल्लेख आलेला आहे. इराक व इराण बॉर्डरवर असलेले मशहद (शहिदांचे गाव) शहरातून हजरत मोहम्मद पैगंबराचे पवित्र केस सय्यद बुर्‍हाण यांच्या वंशजांनी आनले होते. सय्यद बुर्‍हाण हे मीर मुर्तुजा घराण्याचे चौदावे वंशज असून, सध्या त्यांची 18 वी पिढी चालू आहे. मीर मुर्तुजा टकटी हे यांच्या घराण्याचे सातव्या पिढीचे वंशज होते. टकटी म्हणजे लगान वसूल करणारा मोघलकालीन निजामशाहीच्या काळातील प्रतिनिधी होय. यावरुन सदर ठिकाणचे नाव मीर मुर्तजा टकटी दरवाजा असे संबोधण्यात आले. या संबंधी पुरावे देखील उपलब्ध असल्याची माहिती पुजारी सय्यद बुर्‍हाण यांनी दिली. नगरला परंपरेनुसार दरवर्षी फक्त हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनीच पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येतात. याच दिवशी नगर शहरातून झेंड्याची मिरवणुक काढण्यात येवून, ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप केले जाते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget