DNA Live24 2015

प्रभागात विशेष लक्ष देणार : ब्रिगेडियर सावंत

अहमदनगर :
आपची उमेदवारी करणार्‍या उमेदवारांच्या प्रभागात विशेष लक्ष देऊन त्यांना निवडून आनण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची भावना आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर प्रभाग क्र.14 मधील आपच्या उमेदवार जयश्री शिंदे व महेश शिंदे यांची भेट घेऊन सावंत यांनी आढावा घेतला. तसेच भवानी नगर येथील नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य सचिव सुभाष तंवर, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य किरण उपकारे, दिलीप घुले, अ‍ॅड.लक्ष्मण प्रधान, अ‍ॅड. सुनील आठरे, भारतीय देशभक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे, प्रवक्ते मेजर रावसाहेब काळे, पोपट बनकर, दीपक वर्मा, मेजर भाऊसाहेब आंधळे, सागर अलचेट्टी आदि उपस्थित होते.

विनायकनगर, भवानीनगर, सारसनगर या प्रभागातील अनेक नागरिकांच्या समस्या आहेत. येथील नागरिक जागृत झाले असून, प्रत्यक्षात बोलून दाखवीत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमदनगर सुधार आघाडीचे उमेदवार कटिबध्द राहणार असून, मोठ्या मताधिक्याने ते निवडून येणार असल्याची भावना अ‍ॅड.महेश शिंदे यांनी व्यक्त केली. अमदनगर सुधार आघाडी नगरमध्ये परिवर्तन घडवणार असून, जनतेने निवडणुक हातात घेतल्याचे अ‍ॅड.शिवाजी डमाळे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget