DNA Live24 2015

रंगला कुस्तीचा थरार

अहमदनगर :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या 62 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि 41 वी कुमार (सब-ज्युनिअर), 23 वी ग्रीकोरोमन राज्य अजिंक्यपद 2018 कुस्ती स्पर्धेसाठी नगर तालुक्यातील मल्लांची निमगाव वाघा येथे निवड चाचणी घेण्यात आली. 225 मल्ल सहभागी झालेल्या या निवड चाचणीत कुस्त्यांचा थरार रंगला होता.

डफाचा निनादात मल्लांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शनकरीत एकापेक्षा एक सरस डावांनी कुस्ती शौकिनांची मने जिंकली. नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजनाने कुस्ती लावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, मा.सरपंच साहेबराव बोडखे, सचिव पै.बाळू भापकर, उपाध्यक्ष बाळासाहेब दुसूंगे, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले, पै.विलास चव्हाण, पै.कादर शेख, वस्ताद भानुदास ठोकळ, अण्णा जाधव, मयुर काळे, पै.संदिप डोंगरे, अंबादास जाधव, शिवाजी जाधव, दशरथ गव्हाणे, पै.बबन शेळके, शिवाजी जाधव, पै.पोपट शिंदे, नवाब शेख, नामदेव भुसारे, पै.अंबादास ठोकळ, पै.विकास निकम, पै.काका शेळके, गुलाब केदार, मुकुंद भांड, अजय अजबे, संजय कापसे, सुखदेव साळवे, जालिंदर आतकर, रावसाहेब कार्ले, अरुण काळे आदि उपस्थित होते. 

प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी खेळामध्ये अनेक संधी निर्माण झाल्याअसून युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन करुन, स्पर्धेची माहिती दिली. माधवराव लामखडे म्हणाले की, खेळाद्वारे युवक सदृढ होवून राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित होणार आहे. आवड असलेल्या खेळात स्वत:ला झोकल्यास त्यामध्ये यश निश्‍चित मिळते. सदृढ राष्ट्र निर्माणासाठी युवकांनी मैदानी खेळाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गावाच्या बिरोबा मंदिराच्या प्रांगणात रंगलेल्या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या स्पर्धेसाठी पंच म्हणून पै.गणेश जाधव, पै.समिर पटेल यांनी काम पाहिले. यामधील विजेत्या मल्लांना वरील कुस्ती स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीकरिता पाठविण्यात येणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget