DNA Live24 2015

चुकीच्या पध्दतीने जमीन मोजणी केल्याने उपोषण

अहमदनगर :
वडिलोपार्जित जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाने चुकीच्या पध्दतीने मोजणी करुन अन्याय केल्याच्या निषेधार्थ मंगळवार दि.20 नोव्हेंबर पासून जगन आल्हाट व त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे जगन आल्हाट यांची गटनंबर 662 मध्ये एकूण क्षेत्र 5 एकर, 10 गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. याची सातबाराला नोंद देखील आहे. मात्र शेताला लागून असलेल्या गुंडप्रवृत्तीच्या काही लोकांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन आपल्या जमीनीची मोजणी करुन घेतली. तर त्याची हद्द दाखविताना जगन आल्हाट यांच्या अर्ध्या शेतामध्ये जाऊन खुना करण्यात आल्या. आर्थिक देवाण-घेवाण होऊन ही मोजणी करण्यात आल्याचा आरोप आल्हाट यांनी केला आहे. सदरील व्यक्ती जमीन बळकाविण्यासाठी धमकावत असून, चुकीच्या पध्दतीने केलेली मोजणी रद्द करुन न्याय मिळण्याच्या मागणीसाठी ते उपोषण करीत असल्याचे प्रसिध्दीपत्रकात सांगण्यात आले आहे.  

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget