DNA Live24 2015

ग्रामस्थांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द : लामखडे

अहमदनगर :
निंबळक गटातील ग्रामस्थांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असून, विविध विकास कामे करण्यात येत आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादीत ठेवून, गावाच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रपणे कामे करावे. ग्रामस्थांनी देखील चालू असलेल्या विकास कामाबाबत जागृकतेने कामाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे. विकासासाठी नेहमीचे प्रयत्नशील राहणार असून, विकासकामात खोडा घालणार्‍यांना ग्रामस्थांनी खड्यासारखे दूर करण्याचे आवाहन जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.

नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ता डांबरीकरण व जि.प. प्राथमिक शाळा वर्ग खोल्यांच्या बांधकाम कामाच्या शुभारंभा प्रसंगी लामखडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस किसनराव लोटके, सरपंच संगीता कुलट, उपसरपंच ज्ञानेश्‍वर पठारे, मिटू कुलट, पंचायत समितीचे अभियंता एम.डी. झावरे, सुनिल कुलट, गुलशन कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किसनराव लोटके म्हणाले की, माधवराव लामखडे यांच्या रुपाने निंबळक गटात विकासात्मक कामात मोठी भर पडली आहे. विकास कामाचा झपाटा त्यांनी लावला असून, धोरणात्मक विकास करुन गुणवत्तापुर्ण कामाला त्यांनी प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने लामखडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या विकास कामात खातगाव ते टाकळी तसेच खातगाव ते खारेकर्जुने रस्ता डांबरीकरण आणि जि.प. प्राथमिक शाळेत दोन वर्ग खोल्या बांधण्याच्या कामाचा समावेश आहे.   

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget