DNA Live24 2015

पुण्याचे नामकरण जिजापूर करण्याची विद्रोही विचारंमचची मागणी

अहमदनगर :
पुण्याचे नामकरण जिजापूर करण्याची मागणी विद्रोही विचारमंचच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी आग्रही भुमिका घेणार्‍या संभाजी ब्रिगेडचे स्वागत करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन सत्तेवर आलेल्यांनी औरंगाबाद व उस्मानाबादचे नामकरण करण्याची आग्रही भुमिका घेतली आहे. पण प्रथम पुण्याचे नामकरण जिजापूर करावे. पुण्याची सुरुवातीची जडणघडण जिजाऊंच्या इच्छेनुसार छत्रपती शिवरायांनीच केली. पुणे शहराचा मान-सन्मान जिजाऊमुळेच झालेला असल्याचे प्रसिध्दीपत्रकात विद्रोही विचारमंचचे जालिंदर चोभे मास्तर यांनी म्हंटले आहे.

सध्या भाजप सरकारने देशात शहराच्या नामांतराची चळवळ उभी केली आहे. मुख्य प्रश्‍नांवरुन लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा सत्ताधार्‍यांचा हा डाव आहे. मागील साडेचार वर्षात सत्ताधारी सरकारला काहीच करता आलेले नाही. नोटाबंदी फसली, विकासाचा दर घटला, जीएसटीमुळे उद्योगधंदे मंदावले, कामगारांचा रोजगार बुडाला, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटलेले नसून अनेक क्षेत्रात सरकार अपयशी ठरलेले आहे. येत्या 2019 च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नागरिकांना धार्मिक, भावनिक व जातीय राजकारणाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप विद्रोही विचारंमचने केला आहे.

शहराच्या नामांतरापेक्षा तेथील उद्योगधंद्यांचा विकास व युवकांना रोजगाराची अपेक्षा आहे. मात्र चालू असलेल्या शहर नामांतरामध्ये पुणेचे नामांतर अग्रक्रमाने झाला पाहिजे. या नामांतराने राजमाता जिजाऊंचा खर्‍या अर्थाने सन्मान होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मागणीसाठी विद्रोही विचारमंचचे मार्गदर्शक कमिटी सदस्य बाळासाहेब मिसाळ, खासेराव शितोळे, प्रा.मोहन देशमुख, प्रा.भि.ना. दहातोंडे, प्रा.शिवाजी देवढे, आनंद वायकर, स्मिता पानसरे, बहिरनाथ वाकळे, कॉ.बाबा आरगडे, अर्शद शेख, रेव्ह.सुनिल भांबळ, शिवाजी डमाळे, अशोक सब्बन, अजय महाराज बारस्कर आदी प्रयत्नशील आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget