DNA Live24 2015

विखे पाटील यांना भारी ठरली कर्डीले यांची खेळी..!

अहमदनगर :
महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणी कोतकर गटाने भाजपशी हातमिळवणी केल्याचा जबरदस्त धक्का काँगेस पक्षाला बसला आहे. या खेळीचे बीज सोधा राजकारणात असून या खेळीमुळे आमदार शिवाजी कर्डीले विखे पाटील गटास भारी ठरल्याची चर्चा नगर शहरात आहे.

केडगाव येथील तीन प्रभागात कोतकर गटाची ताकद असल्याचे मानले जाते. त्यामुळेच स्वबळावर नगरची सत्ता ताब्यात घेताना भाजपने माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शहरातील काँग्रेस खिळखिळी होणार आहे. हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा झटका मनाला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी महापालिका निवडणुकीत व्यक्तिगत लक्ष घातले होते. त्यांना तर या झटक्याने मोठाच धक्का बसल्याचे मानले जाते. आमदार कर्डीले आणि सुजय विखे पाटील यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र, या खेळीत कर्डीले हे विखे गटावर भारी ठरल्याचे चित्र आहे, असे बोलले जात आहे.

त्याचवेळी यातही काहीतरी समझोता एक्सप्रेस असून पुढील काळात आणखी काहीजण भाजपमध्ये जाऊन पावन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही खेळी जोरात असतानाच यामुळे नगर शिवसेना या पक्षाबद्दल पुन्हा एकदा मतदारांना आस्था वाटू लागली आहे. त्यामुळेच केडगावचा धक्का भाजपच्या कितपत पचनी पडणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget