DNA Live24 2015

रात्री होणार्‍या भारनियमामुळे गावात चोर्‍यांचा सुळसुळाट

अहमदनगर :
तालुक्यातील निंबळक येथे शेतीपंम्प व सिंगलफेज भारनियमच्या वेळेत बदल करण्याची आणि शेतीपंम्पाचे नवीन कोटेशन भरुन घेण्याची मागणी निंबळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महावितरणचे सहा. अभियंता डी.ए. झांजे यांना देण्यात आले. तर सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी उपकार्यकारी अभियंता के.बी. कोपनर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी मा.सरपंच विलास लामखडे, नवाझ शेख, पंढरीनाथ लामखडे, मारुती गारुडकर, सागर गारुडकर, बाबासाहेब पगारे, अशोक शिंदे, अशोक पवार, बाळासाहेब गायकवाड, लक्ष्मण होळकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

निंबळक, इसळक, व खारेकर्जुने या तीन गावात शेती पंम्प व सिंगलफेजचे भारनियमन दु.4:40 ते रात्री 10:48 पर्यंन्त केले जाते. सध्या या गावात अंधाराचा फायदा घेत चोर्‍याचे व लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात घडत आहे. या परिसरात एमआयडीसी येथे कार्यरत असणारे कामगार वर्ग असल्याने कंपनीतून काम संपल्यावर रात्री घरी येण्यासाठी कामगारांना अनेक अडचणी येत आहे. तरी महावितरण विभागाने तातडीने दखल घेऊन पहाटे 4:40 ते सकाळी 8:40 तसेच दुपारी 4:40 ते 6:40 असे भारनियमाच्या वेळापत्रकात बदल करावा. तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी उपयोग होण्यासाठी शेती पंम्पाचे नवीन कोटेशन भरुन घेण्याची मागणी करण्यात आली. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget