DNA Live24 2015

निवडणुकीसाठी अहमदनगर सुधार आघाडीची निर्मिती

अहमदनगर :
महापालिका निवडणुकीत अहमदनगर मध्ये परिवर्तन घडणार असून, दिल्लीच्या धर्तीवर आप व देशभक्त पार्टीच्या अहमदनगर सुधार आघाडीला बहुमत मिळणार असल्याची भावना आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आप व देशभक्त पार्टीची युती होऊन अमदनगर सुधार आघाडीची निर्मिती करण्यात आली. दोन्ही पार्टीच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक ब्रिगेडियर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पटवर्धन चौक जवळ झाली यावेळी ते बोलत होते.  
भारतीय देशभक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी डमाळे यांनी आप व देशभक्त पार्टी वैचारिक पातळीवर एकत्र आले असून, खर्‍या लोकशाहीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन शहराचा विकास करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी अमदनगर सुधार आघाडीची निर्मिती केली असून, याला नगरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भारतीय देशभक्त पार्टीचे प्रवक्ते मेजर रावसाहेब काळे, प्रसिद्धीप्रमुख पोपट बनकर, अ‍ॅड.महेश शिंदे, सागर अलचेट्टी, सुभेदार भाऊसाहेब आंधळे, रजनी ताठे, आम आदमी पार्टीचे योगेश खेंडके, दीपक वर्मा, बाळासाहेब लांडे, सचिव सुभाष तंवर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य किरण उपकारे, आपचे युवा आघाडी कायदे सल्लागार अ‍ॅड.सुनील आठरे, अ‍ॅड.जावेद काझी, प्रसाद सैंदाणे, संपत मोरे, दिलीप घुले, डॉ.किसन रजपुत, निसारभाई बाटलीवाले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget