DNA Live24 2015

कालव्‍याच्‍या चोहोबाजूस प्रतिबंधात्‍मक आदेश जारी

शिर्डी :
भंडारदरा धरण येथून प्रवरा नदीमार्गे जायकवाडी धरणात पाणी सोडण्‍यात येणार आहे. या  नदीचे प्रवाह दरम्‍यान  बरेचसे के.टी वेअर आहे. या केटी वेअर येथे राहुरी व श्रीरामपूर  विभागातील  शेतक-यांचा मोठया प्रमाणात विरोध होवून पाणी अडविण्‍याची  शक्‍यता आहे.  यापूर्वी सोडण्‍यात आलेले पाणी  शेतक-यांनी पुळया टाकून अडविण्‍यात आले होते. आडविलेले पाणी पुनहा जायकवाडी धरणात दिनांक 17 नोव्‍हेंबर 2018 रोजी सोडण्‍यात येणार आहे. पाणी अडविण्‍यासाठी टाकलेल्‍या फळया काढण्‍याकरिता  शेतक-यांचा मोठया प्रमाणात विरोध होऊन  कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे.

 भंडारदरा धरणातून पाणी सोडण्‍यातप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी म्‍हणून कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या दृष्‍टीकोनातून  श्रीरामपूर व राहुरी तालुक्‍यात प्रतिबंधात्‍मक आदेश  श्रीरामपूर भागाचे उपविभागीय दंडाधिकारी तेजस चव्‍हाण यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144(3) अन्‍व्‍ये प्राप्‍त अधिकाराचा वापर करुन   श्रीरामपूर  उपविभागातील  राहुरी व श्रीरामपूर  तालुक्‍यामधून धरणातील पाणी प्रवाहीत होत असल्‍याने   दिनांक 15 नोव्‍हेंबर 2018 रोजी रात्री 12 वाजेपासून ते आवर्तन संपेपर्यत रात्री 12 वाजेपर्यत  श्रीरामपूर व राहुरी तालुक्‍यातील  प्रवरा, मुळा व गोदावरी नदीपात्रात  व पाणी सोडलेल्‍या  परिसरात  पाणी सोडण्‍यासाठी नियुक्‍त केलेले अधिकारी व कर्मचारी व वाहने तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानी दिलेल्‍या व्‍यक्‍ती  यांना  वगळता कोणालाही प्रवेश करता येणार नाही.  तसेच मोचा आणणे, जमावाने जमणे, शस्‍त्रे काठया इत्‍यादी व स्‍फोटकजन्‍य पदार्थ बाळगणे , साठा करणे इतयादी सर्व हलचालीवर मनाई करण्‍यात येवून प्रतिबंध करण्‍यात येत आहे.  असे श्रीरामपूर भागाचे उपविभागीय दंडाधिकारी  तेजस चव्‍हाण  यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget