DNA Live24 2015

डाळिंब झाले पुन्हा मातीमोल..!

अहमदनगर :
मधल्या काही दिवसांत डाळिंबाला अच्छे दिन आल्याचा अनुभव फार दिवस टिकू शकला नाही. या लाल-गुलाबी फळाचे भाव पुन्हा एकदा मातीमोल झाल्याने उत्पादक शेतकरी तोट्यात जात आहेत.

कोरडवाहू भागातील नगदी फळ म्हणून डाळिंब ओळखले जाते. मात्र, मधल्या काळात सरासरी 80 रुपये/किलो यादरम्यान स्थिर असलेल्या याच फळाचे भाव सध्या सरासरी 30 रुपयांच्या खाली आले आहेत. अहमदनगर मार्केटसह देशभरात हे भाव पडले आहेत. डाळिंब उत्पादनास पाणी देण्याचा खर्च वगळता किमान सरासरी 45 रुपये किलो खर्च येतो. अशावेळी तोच खर्च निघणे दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. सध्या 300 ग्रॅम यापेक्षा मोठ्या फळास सरासरी 55 रुपये, 150-300 या साईजला 35 रुपये तर छोट्या फळांना सरासरी फक्त 15 रुपये भाव मिळत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget