DNA Live24 2015

ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

अहमदनगर :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या 41 वी कुमार (सब-ज्युनिअर) राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 23 वी ग्रीकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2018 साठी नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथे रविवार दि.25 नोव्हेंबर रोजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने घेण्यात येणार असून, नगर तालुक्यातील मल्लांना स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी 8 वा. वजनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, काशीनाथ पळसकर, पै.बाळासाहेब दुसुंगे, पै.बाळू भापकर, अ‍ॅड.अभिषेक भगत, सुभाष नरवडे, किसन वाबळे, उत्तम कांडेकर उपस्थित राहणार आहे. कुमार (सब-ज्युनिअर) राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी कुस्तीगीरांची जन्म दिनांक 1 जानेवारी 2002 ते 31 डिसेंबर 2003 दरम्यानची असावी. तसेच ज्या कुस्तीगीरांची जन्म दिनांक 1 जानेवारी 2004 ते 31 डिसेंबर 2004 या दरम्यानची असेल अशा कुस्तीगीरांना वैद्यकिय अधिकार्‍याचा दाखला व पालकांचे संमतीपत्र देऊन खेळता येणार आहे. कुमार कुस्तीगीरांनी स्पर्धेला येताना आधार कार्ड व जन्माचा दाखला सोबत आनणे आवश्यक असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कुमार (सब-ज्युनिअर) राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी वजनगट पुढीलप्रमाणे 41 ते 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92 व 110 किलो पर्यंन्तच्या गटात निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून पै.गणेश जाधव, पै.मल्हारी कांडेकर, पै.समिर पटेल काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे मो.नं. 9226735346 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget