DNA Live24 2015

मैत्रेय गुंतवणुकदारांना कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे आवाहन

अहमदनगर :
जिल्ह्यातील गुंतवणुकदारांना 23 कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या मैत्रेय कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन कार्यवाही चालू असून, गुंतवणुकदारांचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड आदि कागपत्र इतर संघटना, खाजगी प्रतिनिधी यांच्याकडे न देता अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे व कंपनीच्या सर्व एजंटधारकांना गुतवणुकदारांचे पैसे मिळण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन कंपनीवर गुन्हा दाखल करणारे कंपनीचे एजंट सतीश पाटील यांनी केले आहे. 

संपुर्ण महाराष्ट्रात जाळे असलेल्या मैत्रेय मधील गुंतवणुकदारांना दामदुप्पट व भूखंड देण्याचे अमिष दाखवून अध्यक्ष व संचालकांनी गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घातला आहे. नगर जिल्ह्यातील फेब्रुवारी 2016 पासून 26 हजार गुंतवणुकदारांनी अमिषाला बळी पडून सुमारे 26 कोटी रुपये मैत्रेय मध्ये गुंतवले होते. गुंतवणुकदारांनी आरडी व एफडीच्या स्वरुपात या कंपनीत पैसे गुंतवले आहे. यामध्ये कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कर्जतसह नगर शहरातील नागरिकांचा समावेश आहे. अनेकांना सुरुवातीला पैसे मिळाले. नंतर कंपनीकडून मिळालेले धनादेश वटले जात नसल्याने गुंतवणुकदारांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. या कंपनीत कार्यरत एजंटधारकांना गुंतवणुकदार पैश्यांची विचारणा करु लागल्याने जिल्ह्यातील एजंटधारकांनी कंपनीच्या विरोधात आंदोलने करुन गुंतवणुकदारांचे पैसे मिळण्यासाठी पाठपुरावा केला. शेवटी नगरमध्येही 23 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचा गुन्हा 7 महिन्यापुर्वी दि.19 एप्रिलला तोफखाना पोलिस स्टेशनला कंपनीचे एजंट सतीश पाटील यांनी दाखल केला होता.

संबंधीत कंपनीवर गुन्हा दाखल झाल्यापासून अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणी माहिती व दस्ताएवज जमा केले जात आहे. गुंतवणुकदारांनी आपले कागदपत्र अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे सतीश पाटील यांनी सांगितले आहे. गुंतवणुकदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बाळासाहेब वाघ, मच्छिंद्र निकम, रमेश तावरे, अशोक नांगरे, कल्पना बकरे, रेहाना खान, रविंद्र गाडे, सचिन इंगळे, युनूस शेख आदि पाठपुरावा करीत आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget