DNA Live24 2015

शासन शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे : पंकजा मुंडे

बीड : 
जिल्ह्यात झालेल्या आपूऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिल असे सांगून या परिस्थितीतून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासन महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथील चेमरी विश्रामगृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दुष्काळसदृश परिस्थिती आढावा बैठकीत केले.

या बैठकीस खासदार प्रीतम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.चपळे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश निराळी, महेंद्रकुमार कांबळे, प्रियंका पवार, श्री.महाडिक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादनातही घट झाली असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या असून या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची फिडींग ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन होणार असल्याने अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन ही नोंद घेणार आहेत. या नुकसानीचा अहवाल राज्य शासन व केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडू जिल्ह्यातील प्रत्यक्ष पर्जन्यमान व टक्केवारी, तालुकानिहाय प्रत्यक्ष प्रजन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, तालुकानिहाय भूजल पातळी, जिल्ह्यातील तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टँकरची संख्या, पेयजल टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजना टँकर व विहीर अधिग्रहण, शासन निर्णयानुसार दुसरी कळ लागू झालेल्या गावामध्ये करावयाच्या ग्राउंड ट्रुथींग संदर्भातील प्रगती आढावा, पिण्याचे पाणी आरक्षित करण्यासाठी केलेली कार्यवाही, अवैध पाणी उपशावर केलेले प्रतिबंधात्मक कारवाई, खरीप पीक परिस्थितीचा माहिती अहवाल, शेतकरी आत्महत्या आदी माहिती जिल्हाधिकारी श्री.सिंह यांच्याकडून जाणून घेतली. आणि यावर पुढील कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्री यांनी सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये विविध विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देवून तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच साकुड येथील शेतकरी महादेव गोवर्धन चाटे व चंपाबाई चाटे यांच्या शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्यांच्याशी संवाध साधला. तसेच चनई येथील शेतकरी महादेव निवृत्ती गोचडे, उमराई येथील राम हरिचंद्र मुळे, केंद्रवाडी येथील यांच्या शेतीतील कापूस पिकाची पाहणी करुन त्यांच्याशी संवाद साधला. केज तालुक्यातील केंद्रवाडी येथील व्यंकट केंद्रे आणि आडस येथील विद्यानंद गणपतराव आकुसकर, अनंत गणपत लाखे यांच्या शेतीतील कापूस पिकाची पाहणी करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

@'महान्यूज' 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget