DNA Live24 2015

इंदिरा गांधी : एक विचार


भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी काळ, एक परदेशाहून आलेल्या एका पाहुणीने या छोट्या मुलीसाठी सुंदर कपडे आणले होते परंतु आम्ही फक्त खादि वापरतो असे सांगत या छोट्या मुलीच्या आईने परदेशी कपडे घेण्यास साफ नकार दिला.मग ती पाहुनी या मुलीकडे वळली कि तुला खरोखरच नको आहेत का कपडे तर या छोट्या मुलीने देखील नकार दिला मग तया पाहुणीने म्हटले कि तुझी आवडीची बाहुली सुद्धा प्रदेशातून बनवलेली आहे , ती सुद्धा तू वापरतेस कि,
त्या नंतर या मुलीने ती बाहुली जिन्यावर नेउन जाळून टाकली. सुरुवातीच्या काळात “गुंगी गुडिया” अशी ओळख असणारी मुलगी द ओन्ली मॅन इन द कॅबिनेट  म्हणून ओळखली जाऊ लागली आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान “इंदिरा गांधी” अशी त्यांची जगभर ओळख.
१९ नोव्हेंबर १९१७ ला त्यांचा जन्म  झाला. इंदिराजी या जवाहरलाल आणि कमला नेहरू यांचे एकमेव अपत्य. आज जे घर जवाहरलाल नेहरू ट्रस्ट वापरते त्या घरात इंदिराजींचे बालपण गेले, त्यावेळी त्याचे नाव आनंदभवन होते, नंतर त्याचे नामांतर स्वराजभवन असे केले गेले.स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढाया, घरी चालणार्या चर्चा यामुळे देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आपसूकच मिळत गेले. पुढे देशासाठी कॉंग्रेसने कितीतरी आंदोलने केली त्यावेळी इंदिराजींनी वानरसेनेची स्थापना केली स्थापनेवेळी त्यांचे वय अवघे ११ होते.या वानरसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला, अनेक निदर्शने केली .
त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अलाहाबाद मधील रोमन कॅथ्लिक शाळेत झाले.तर पुढील शिक्षण पुण्यातील चिल्ड्रन्स ओंस स्कूल मध्ये झाले.पुढे मॅट्रीक झाल्यावर त्या शान्तिनिकेतनला गेल्या याच काळात त्यांनी संगीताची आवड जपली आणि त्यांचे अनेक कलांशी नाते जुळले. टेनिसनची “इन मेमोरीयम” हि त्यांची आवडती कविता होती.त्यांच्या घरात बहुतांशी टेनिसनच्या कविता वाचल्या जायच्या.
पुढील शिक्षणसाठी त्या युरोपात गेल्या आणि तिकडे असताना त्या फिरोज गांधी या तरुणाशी त्यांची चांगली मैत्री जमली आणि मग पुढे याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांनी विवाह सुद्धा केला.या विवाहाला त्यावेळी नेहरुजींचा विरोध होता त्याचे कारण म्हणजे वयाच्या मानाने लग्न फार लवकर होते आहे म्हणून. त्यांना पुढे राजीव आणि संजय अशी दोन मुले झाली.फिरोज गांधी आणि इंदिराजी या दोघांना १९४२ च्या लढ्यात अटक झाली होती.पुढे फिरोज गांधी हे खासदार झाले.दिल्लीत गेल्यानंतर अनेक मुलींसोबत त्यांचे नाव जोडले जाऊ लागले त्यामुळे इंदिराजींनी घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतला. पुढे  हृदयविकाराच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचा राजकीय प्रवेश वयाच्या  २१ व्या वर्षी झाला.१९५९ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात त्यांनी माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून काम केले.लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्युनंतर त्या भारताच्या ५ व्या पंतप्रधान झाल्या.पंतप्रधान पदासाठी मात्र त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला कारण त्यांना पंतप्रधान पदासाठी पक्षाअंतर्गत विरोध होता. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांना सत्ता टिकवण्यासाठी इतर पक्षाचे पाठबळ घ्यावे लागले कारण इंदिराजी पंतप्रधान झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये फुट पडण्यास सुरुवात झालेली होती. देशात आणीबाणी लागू केल्या नंतर त्यांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला परंतु पुन्हा १९८० च्या निवडणुकांमध्ये तया विजयी झालय आणि दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान बनल्या. त्यांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री आणि माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून मंत्रिमंडळात वाखाणण्याजोगे काम केले.इंदिराजींना “भारताची आयर्न लेडी” हि ओळख याच काळात प्राप्त झाली.
इंदिराजींवर अनेक पुस्तके लिहिण्यात आली,त्यात किती खर्या आणि किती खोट्या गोष्टी छापल्या गेल्या.त्यावरून आजही वाद होतात ,डॉम मोराइस यानी इंदिराजींवर लिहिलेले पुस्तक तर इंदिराजींनी हातात घ्यायला पण नकार दिला होता.
इंदिराजी लहानपणापासून अगदी मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मनात एक द्वंद्व घेऊन जगत होत्या. कारण लहानपणी त्यांच्या वाट्याला वडील जास्त आले नाहीत, आईचा मृत्यू, पतीचा आणि वडिलांचा मृत्यू,वैवाहिक जीवनातील अस्वस्थता,राजकीय निर्णय, स्वताच्या इच्छेला घातलेली मुरड. अश्या बर्याच घटनांचा उल्लेख त्यांनी अमेरिकन मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात आणि इतर जवळच्या व्यक्तींकडे केला आहे.
इंदिराजींचा उमेदीचा बर्यापैकी काळ जवाहरलाल नेहरूंच्या सेवेतच गेला. यावेळी त्यांनी आपल्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात इंदिराजी म्हणतात कि त्यांचे परदेशातील शिक्षक त्यांना म्हणाले होते कि आयुष्यात जर काही बनायचे असेल तर आतपासून जगायला सुरुवात कर.परंतु वडिलांची सेवा कि स्वताचे जीवन यातील सुवर्णमध्य त्यांना कधीच गाठता आला नाही  त्यामुळे त्यांनी वडिलांची सेवा निवडली.
इंदिराजींच्या स्वभावाबद्दल आणि कार्याबद्दल अनेक वाद आहेत, देशाच्या घडण्यात आणि बिघडण्यात त्यांचा मोठा हात आहे अशी म्हणले जाते. या सगळ्या गोष्टीमागे एक छोटी गोष्ट आहे ती म्हणजे देशाच्या सर्वात उच्च अशा पदावर असताना आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर जिथे कलाटणी मिळू शकणार होती अशा वेळी  त्या एकट्या होत्या. ऐन तारुण्यात (म्हणजेच आई गेल्यानंतर) त्या एकाकी पडल्या. वडील आणि नवरा या दोघांच्या मृत्युनंतर मात्र त्या खूपच एकाकी झाल्या.त्याचाच परिणाम म्हणजे इंदिराजी सहकार्यांवर जास्त विश्वास ठेवत नसत.त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बर्याच घटनांचा परिणाम त्त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणात झाला.
इंदिराजींच्या आयुष्यात ५ खूप महत्वपूर्ण घटना होत्या.ज्यातील घटनातील काही निर्णय देशाला पुढे नेणारे ठरले तर काही निर्णयांमुळे त्यांना सत्ता सोडावी लागली.

१- १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण
२- पहिली अणुचाचणी
३- त्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असताना त्यांचे पतीचा कॉंग्रेस विरोध आणि तणावग्रस्त संबंध
४- देशासाठी घेतला गेलेला आणीबाणीचा निर्णय
५- शेवटचा निर्णय म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार ज्यामुळे त्यांना स्वताचे प्राण गमवावे लागले.(शीख समाजातील दोन अंगरक्षकांनी इंदिराजींची हत्या केली.)
शेवटच्या काळात त्या नातवंडासोबत जास्त वेळ व्यतीत करत असायच्या.  इंदिराजींचे आयुष्य हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर देशासाठी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची हत्या होणे हि सर्वात वाईट गोष्ट होती.
त्यांच्या राजकारणाचे दाखले आजही दिले जातात.भारतीय राजकारणातील त्या एक झंझावती “वादळ” होत्या.


- विनोदकुमार सुर्यवंशी

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget