DNA Live24 2015

विद्यार्थ्‍यासाठी सैन्‍य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

शिर्डी :
जिल्‍हयातील अकोले तालुक्‍यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प राजूर यांच्‍यामार्फत  अनुसूचित जमातीच्‍या  विद्यार्थ्‍यांना मवेशी ता.अकोले येथे चार महिन्‍याचे निवासी व भोजन व्‍यवस्‍थेसह मोफत  सैन्‍य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सदर प्रशिक्षण दिनांक 1 डिसेंबर 2018 ते 30 मार्च 2019  या कालावधीत आयोजित करण्‍यात आले आहे.  या प्रशिक्षणात सहभागी होण्‍याकरिता  इच्‍छूक विद्यार्थ्‍याची पात्रता -  शिक्षण 12 वी पास, वय 18 ते 24 वर्षे, उंची 165 सें.मी, वजन किमान 45 कि.गॅ. तसेच आवश्‍यक कागदपत्रे दोन फोटो,  आधार कार्ड, जातीचा दाखला , 12 वी उत्‍तीर्ण गुणपत्रक, रहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड आवश्‍यक आहे. निवड करण्‍यासाठी शाररिक परीक्षा व लेखी परीक्षा घेण्‍यात येईल.

इच्‍छूक विद्यार्थ्‍यांनी दिनांक 25 नोव्‍हेंबर 2018 रोजी शासकीय आश्रम शाळा  मवेशी ता. अकोले जि. अहमदनगर येथे सकाळी 10 वाजता मूळ व झेरॉक्‍स कागदपत्रांसोबत उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी दूरध्‍वनी क्र. 02425-251037  मो. 8275349414 व 9960112600 वर संपर्क साधावा असे राजूर  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍पाचे प्रकल्‍प अधिकारी संतोष ठुबे यांन एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget