DNA Live24 2015

पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर  :
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  देण्‍याची योजना कार्यान्वित असून राज्‍यातील सर्वोत्‍कृष्‍ट  खेळाडू , साहसी उपक्रम, दिव्‍यांग  खेळाडूसह संघटक , कार्यकर्ते, उत्‍कृष्‍ट  क्रीडा मागदर्शक ,महिला मार्गदर्शक  व संघटक / कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता क्रीडा पुरस्‍कार तसेच ज्‍येष्‍ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो.

सन 2017-18 या वर्षासाठी  संघटक/कार्यकर्ते या पुरस्‍कारासाठीच्‍या  संबंधित अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज  25 नोव्‍हेंबर 2018 पर्यत व आंतरराष्‍ट्रीय / राष्‍ट्रीय स्‍तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू , साहसी उपक्रम, दिव्‍यांग  खेळाडूसह क्रीडा मागदर्शक यांच्‍यासाठी 5 डिसेंबर 2018 पर्यत सादर करावेत. संबंधित  ऑनलाईन पध्‍दतीने  आपल्‍या कामगिरीचा तपशीलासह विहित नमुन्‍यातील अर्ज  www.mumbaidivsports.com  या संकेतस्थळतील लिंकवर उपलब्ध  आहेत. दिनांक 25 नोव्हेंबर 2018 पूर्वी ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करावेत तसेच ऑनलाइन अर्जाची प्रत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 डिसेंबर 2018 पूर्वी स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह सादर करावी.

तसेच अधिक माहितीसाठी  जिल्‍हा क्रीडा कार्यालय, वाडिया  पार्क ,टिळक रोड, अहमदनगर  येथे संपर्क साधावा असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget