DNA Live24 2015

पोलीस कुटुंबातील गरजूंना आर्थिक मदत करून श्रद्धांजली

अहमदनगर :
26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलिसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मिलेनियम, प्राईड, लायनेस मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, रोटरी सेंट्रल, युवान व पोलीस दलाच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रारंभी दिल्लीगेट येथून भारत माता की जय घोषात हातात तिरंगे ध्वज घेऊन कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हुतात्मा स्मारकावर जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा, संदेश कटारिया, अंजली कुलकर्णी, मनिष नय्यर, डॉ.विनोद मोरे, डॉ.प्रमोद मुथा, मिना हरवानी, शर्मिला पाटील, सोनी रंगलानी, नरेंद्र बोठे, गगनकौर वधवा, डॉ.नेहा जाजू, निलम परदेशी, सुनंदा तांबे, शर्मिला कदम, अरविंद पारगावकर, सतिष बजाज, मनिष बोरा, रमेश वाबळे, हेमंत नरसाळे, राजू गुरनानी, मनयोगसिंग माखीजा, सनी वधवा, अश्‍विनी भंडारे, कौशिक कोठारी, अमित बोरकर, धनंजय भंडारे, सुनिल छाजेड, प्रमोद पारेख, युवानचे संदीप कुसळकर, किरण भंडारी, उमेश परदेशी, प्रशांत मुनोत, तुलसीभाई पालीवाल, अनिल पाटोळे आदिंसह नागरिक सहभागी झाले होते.

प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची आहुती देणार्‍या जवान व पोलीसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमा निमित्त पोलीस कुटुंबातील सुशांत शिंदे या दिव्यांग विद्यार्थी तर अर्चना परदेशी या विधवा महिलेस संघटनांच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. पोलीसांच्या बॅण्ड पथकाने सादर केलेल्या देशभक्ती गीतांनी कार्यक्रमात चैतन्य संचारला होता. संविधान दिना निमित्त यावेळी देशाची एकात्मता, समता व बंधुत्वाची शपथ देण्यात आली.

अरविंद पारगावकर यांनी भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना देशाचा विकास रोखण्यासाठी शत्रू राष्ट्र दहशतवादी कारवाया करुन राष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे हल्ले थांबविण्यासाठी प्रत्येक नागरिकांना सजग व जागृक होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 
रंजनकुमार शर्मा म्हणाले की, जवान सिमेवर तर पोलीस देशातंर्गत सुरक्षितता नागरिकांना देत असतात. मात्र देशातील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी नागरिक सतर्क व जागृक होण्याची गरज आहे. आपल्या भोवतालच्या संशयीत व्यक्ती व काही चुकीच्या घटनेची माहिती पोलीसांना दिल्यास दहशतवादी हल्ले व समाजात घडणारे गुन्हे देखील थांबणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget