DNA Live24 2015

नगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

शिर्डी  :
अहमदनगर जिल्‍हयात  सध्‍या स्‍थानिक  प्रश्‍नांच्‍या संदर्भात राजकीय पक्ष व विविध  संघटनेचे कार्यकर्ते यांचे वतीने  उपोषण, मोर्चा, रस्‍तारोको,  इत्‍यादी प्रकारचे आंदोलनात्‍मक कार्यक्रम चालू आहेत.  तसेच  सकल मराठा व  धनगर समाजाचे वतीने आरक्षणासाठी  व जायकवाडी धरणात पाणी सोडणे संदर्भात जिल्‍हयात  ठिकठिकाणी आंदोलन चालू आहेत तसेच  अहमदनगर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली आहे.  दिनांक 20 नोव्‍हेंबर  2018  रोजी  मुस्‍लीम धर्मियांचा ईद ए मिलाद हा सण उत्‍सव जिल्‍हयात सर्वत्र साजरा करण्‍यात येणार आहे.

  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहमदनगर  जिल्‍हयात महसूल स्‍थळ  सिमेच्‍या हद्दीत  दिनांक 20 नोव्‍हेंबर  2018 रोजीचे 00.00 वाजेपासून दिनांक 3 डिसेंबर 2018 रोजीचे 24 वाजेपर्यत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश  जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केला आहे.

 जिल्‍हादंडाधिकारी श्री.द्विवेदी यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य सक्षम अधिका-यांच्‍या पूर्व परवानगी शिवाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.  त्यात  शस्‍त्रे , काठया सोटेतलवारीबंदुकाभालेसुरेलाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतीलअशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सध्‍यता  अगर नितीमत्‍ता  यास धक्‍का पोहचेल किंवा शांतता धोक्‍यात येईल असे कोणतेही कृत्‍य करणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारेसाधने इत्यादी तयार करणेजमा करणे आणि बरोबर नेणेसार्वजनिक शांतता धोक्यात येईलअशी भाषणे करणेहावभाव करणेअथवा सोंग आणणेजाहीरपणे घोषणा करणेगाणे म्हणणेवाद्य. समावेश आहे.

शासकीय सेवेतील  व्‍यक्‍तीना ज्‍यांना आपले वरिष्‍ठांचे आदेशानुसार  कर्तव्‍य पुर्तीसाठी  हत्‍यारजवळ बाळगणे आवश्‍यक आहे.  तसेच ज्‍या व्‍यक्‍तींना शारिरीक  दुर्बलतेच्‍या कारणास्‍तव  लाठी अगर काठी वापणे आवश्‍यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धर्मिक मिरवणुका, लग्‍नसमारंभ, लग्‍नाच्‍या मिरवणूका हे कार्यक्रम,  सभा घेणेस अगर मिरवणूक काढण्‍यास ज्‍यांनी संबंधीत प्रभारी पोलिस निरीक्षक तथा सहाय्य पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्‍यक्‍तींना लागू होणार नाहीत. अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत  दिनांक 20 नोव्‍हेंबर 2018 रोजीचे 00.00 वाजेपासून दिनांक 3 डिसेंबर 2018 रोजीचे 24 वाजेपर्यत जारी राहील असे ही एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget