DNA Live24 2015

आणखी दोन महसूल मंडळामध्‍ये दुषकाळ घोषित

शिर्डी  :
राज्‍यातील दुष्‍काळ घोषित केलेल्‍या 151  तालुक्‍यापैकी अहमदनगर जिल्‍हयातील 11 तालुक्‍या व्‍यतिरिक्‍त ज्‍या महसूली मंडळामध्‍ये जून ते सप्‍टेंबर  2018  या कालावधीत  तालुक्‍यात सरासरी पर्जन्यच्‍या 75 टक्‍केपेक्षा कमी व एकूण पर्जन्‍यमान 750 मि.म  पेक्षा कमी झाला आहे.  अशा नमूद केलेल्‍या  एकूण 268 महसूली मंडळापैकी अहमदनगर  जिल्‍हयातील  कोपरगाव तालुक्‍यातील दहिगाव व श्रीरामपूर तालुक्‍यातील  बेलापूर  या महसूली मंडळामध्‍ये  दुष्‍काळ घोषित जाहीर केला आहे..

या महसूल मंडळामध्‍ये दुष्‍काळ घोषित झाल्‍यामुळे  जमीमन महसूलात सूट, सरकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्‍या वसूलीस स्‍थगिती, कृषी पंपाच्‍या चालू वीज बिलात 33.5 टक्‍के सूट,  शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍याच्‍या परीक्षा शुल्‍कात माफी,  रोहयो अंतर्गत  कामाच्‍या निकषात काही प्रमाणात शिथिलता,  आवश्‍यक  तेथे  पिण्‍याचे पाणी  पुरविण्‍यासाठी टॅकर्सचा वापर व टंचाई जाहीर केलेल्‍या गावात शेतक-यांच्‍या  शेतीच्‍या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती जाहीर करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी एका आदेशान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget