DNA Live24 2015

बेरोजगारांना व्‍यवसायाचे मोफत प्रशिक्षण

अहमदनगर :
महात्‍मा फुले मागासवर्गीय  विकास महामंडळ अहमदनगर यांच्‍या मार्फत  सन 2018-19 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती  व नवबौध्‍द, महार, बुरुड, मेहतर, वाल्‍मीकी, हिंदू खाटीक, जंगम (भेडा) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसाठी  विविध व्‍यवसायाचे मोफत प्रशिक्षण  देण्‍यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण कालावधीत प्रती महा विद्यावेतन  देण्‍यात येणार आहे.

इच्‍छूक लाभार्थीकडून  प्रशिक्षणाकरीता दिनांक 28 नोव्‍हेंबर 2018 पर्यत  अर्ज  मागविण्‍यात येत आहेत. इच्‍छूक लाभार्थींनी आवश्‍यक  कागदपत्रासह  महात्‍मा फुले  मागासवर्ग विकास महामंडळ  123 वी हालिमा मेन्‍शन, मनिष मोटर्ससमोर, कोठला रोड, सर्जेपूरा, अहमदनगर ( दूरध्‍वनी क्रमांक 0241- 232314) येथे अर्ज जमा करावे असे  जिल्‍हा व्‍यवस्‍थापक  एस. एन शिंदे यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget