DNA Live24 2015

शेतीत कष्ट असोत की अॅग्रो एजुकेशन.. महिलांचीच मक्तेदारी कायम..!


स्पेशल रिपोर्ट 

शेती असा विचार केला तरीही आपण त्याला पुरुषांशी जोडतो. बळीराजा हा शब्द वापरणे असोत की बातमीदारी. त्यात महिला शेतकरी किंवा शेतीमधील महिला यांच्याकडे दुर्लक्षच होते. मात्र, जमिनीच्या मालकीचा कमी टक्के असणाऱ्या महिलाच हजारो वर्षांपासून शेतीत काबाडकष्ट करून कष्टाचा मळा फुलवीत आहेत. तसेच आता शेतीविषयक शिक्षण घेण्यामध्येही महिलांचा टक्का पुरुषांच्या तुलनेत लक्षणीकरित्या जास्त असल्याचे समोर आले आहे. त्याबद्दल समाजाला माहिती देण्याचा हा प्रयत्न.

नुकतीच डेक्कन हेराल्ड या इंग्रजी दैनिकातील बातमी वाचण्यात आली. बातमी महाराष्ट्रातील नाही. कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू येथील आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी तेथील गांधी कृषी विज्ञान केंद्रात कृषी मेळाव्याचे उदघाटन केल्यानंतर म्हटले की, देशाच्या एकूण लोकसंख्येतील शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांचा टक्का अजूनही ५५ आहे. तसेच ऍग्रीकल्चर एजुकेशन अर्थात कृषी शिक्षणात महिलांची मक्तेदारी असून देशातील एकूण शेती विषयाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ६० टक्के आहे.

ही बातमी वाचल्याने पुन्हा एकदा शेती आणि महिला यांचे घनिष्ठ संबंध स्पष्ट झाले. आधुनिकीकरणात शेतीपद्धतीसह ग्रामीण आणि शहरी परिस्थिती बदलली. खानपानाच्या पद्धती बदलल्या. काही पद्धती नव्याने आल्या. मात्र, तारोही शेती आणि महिला यांचा संबंध कुठेही तुटला नाही. कमी झाला नाही. उलट शेती हेच समाजाला उन्नतीकडे नेण्याचे साधन असल्यावर महिलांनी शिक्कामोर्तब केले.

सामाजिक अंगाने विचार करता महिला खूप विकासवादी विचारांच्या असतात. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भापज या राजकीय पक्षाने त्याच विचारांच्या आधारावर आपले पक्षाचे प्रचार धोरण केंद्रित केले आहे. उज्ज्वला योजना असो की इतरही महिलांच्या सामाजिक उन्नतीच्या योजना. त्यांची फलनिष्पत्ती काहीही असोत, त्याचे यश ठोकून सांगण्यात केंद्र व राज्य सरकार कुठेही मागे नाही. महिलांचा विकासवादी दृष्टिकोन लक्षात घेऊन आपली वोट बँक विस्तारित करण्याचा हा प्रयत्न आहे. अशाच विचारांचा अभाव असल्याने काँग्रेस व इतर पक्ष मागे पडले. तर, भाजपने याचा (गैर)फायदा घेतला. ग्रामीण असो की शहरी भाग असो. त्यामुळेच महिलांना मोदी खूप काम करीत असल्याचे वाटते.

तर, मुद्दा भरकटलाय हे मान्य. परंतु, महिला सकारात्मक विचारांनी विकासाचा दृष्टिकोन ठेऊन जगत असतात हे सांगण्यासाठी ते उदाहरण. बाकी महिला आणि शेती यांची ही घनिष्ट मैत्रीच मानव जातीला प्रगतीकडे घेऊन येणारी ठरली आहे. पोटाला खायला मिळाल्यावर विचारांना चालना मिळते. महिलांनी हजारो वर्षांपूर्वी शेती करण्यास सुरुवात करून भटक्या मानव जातीला समाज म्हणून जगण्याचा विचार दिला. आताही आधुनिक युगाच्या 'रणरागिणी' शेतीचे शिक्षण घेऊन शांततामय सहजीवन जगण्यासाठी शेती हाच पर्याय असल्याचे मानत आहेत. त्यामुळेच शेतीमधील कष्ट असोत की कृषी शिक्षण यात महिलांचा टक्का कायम आहे आणि तो वाढत आहे. आणि तोच घटक समाजाला सकारात्मक दिशाही देणार आहे.

- माधुरी सचिन चोभे,
प्रकाशक, कृषीरंग

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget